Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना ईस्टरच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

 

 

 

 गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना विशेषता: ख्रिश्चन बांधवाना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. येशू ख्रिश्तांच्या पुनरूत्थान स्मरणोत्सवाचा प्रसंग साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे वाईट प्रवृत्तीवर सत्याचा विजयाचे प्रतिक आहे.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, गुड फ्रायडे हे मानवजातीमधील मैत्री, बंधुता आणि मानवी मूल्यांचे बंध दृढ करण्यासाठी प्रभू येशू ख्रिश्तांच्या सर्वोच्च आणि नि:स्वार्थ बलिदानाचे प्रतिक आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणतात येशू ख्रिश्ताने उपदेश केलेल्या क्षमा आणि करूणा या शाश्वत आणि मौल्यवान संदेशाचे स्मरण करणे हा आपल्यासाठी एक शुभ प्रसंग आहे. ईस्टर सण हा लोकांमध्ये अधिक शांतता, आनंद आणि एकता घेऊन येवो.

ईस्टर आपल्या सर्वाना इतरासाठी कार्य करण्यास, आपल्या विवेकाचे पालन करण्याची आठवण करून देतो. इतरांच्या कल्याणासाठी झटण्याची आपण शपथ घेऊया. ईस्टर सण आपण प्रत्येकांना अधिक समृध्दी आणि आनंद आणण्यास प्रेरणा देवो. आपण शांतता आणि आनंदाचे प्रेषित बनुया असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.