Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय जलक्रीडा परिसर आणि मांडवी किनारपट्टी संरक्षणाची पाहणी

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज करंजाळे, पणजी येथील राष्ट्रीय जलक्रीडा कॅम्पसला भेट देऊन चालू प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी विकासाबद्दल समाधान व्यक्त केले आणि हा प्रकल्प या वर्षाच्या मे अखेरीस पूर्ण होईल अशी पत्रकारांना माहिती दिली. या संस्थेच्या प्रकल्पात पर्यटन आणि संबंधित व्यवसाय क्षेत्रांत  बीबीए, एमबीए आणि पीएचडी अभ्यासक्रम सुविधा असतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स ही देशातील अवकाश जल क्रीडा परवाना देणारी शिखर संस्था असून विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम, आल्पत्कालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करून संस्था जल क्रिडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार करते. दरवर्षी २५०० हून अधिक विद्यार्थी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. एनआयडब्ल्यूएसचे व्यवस्थापक (प्रशिक्षण), श्री रणजीत सिंग, एनआयडब्ल्यूएसचे लेखा अधिकारी श्री कमल पराशर, एनआयडब्ल्यूएसचे प्रशिक्षक श्री समीर कर्पे यावेळी उपस्थित होते.

नॅशनल वॉटर स्पोर्ट्स कॅम्पसच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी मांडवी किनारपट्टीवर सुरू असलेल्या संरक्षण आणि जीर्णोद्धाराच्या कामाचीही पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी आणि कामगारांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

या प्रकल्पाचे काम अत्यंत सावधगिरीने आणि अचूकतेने केले जात असून प्रकल्पाच्या प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे.