Connect with us

गोवा खबर

वेब सिरीज वर सरकारने नियंत्रण ठेऊन त्यासाठी सेन्सॉर बोर्ड लागू करावा : सतीश कल्याणकर

Published

on

Spread the love
‘ओ.टी.टी.ची वेब सिरीज कि अश्लीलतेचे माध्यम ?’ या विषयावर विशेष संवाद !
 

गोवा खबर:आज वेब सिरीज एक प्रभावी माध्यम झाले आहेवेब सिरीज/.टी.टी.ला कुठलीही सेन्सॉरशिप लागू केलेली नाहीसरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजेवेब सिरीजसह वाहिन्यांवर दाखवण्यात येणार्‍या मालिकाकार्यक्रम यांच्यासाठीही सेन्सॉर बोर्ड लागू करावाअशी मागणी ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’चे माजी सदस्य श्रीसतीश कल्याणकर यांनी केलीते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ओ.टी.टी.ची वेब सिरीज कि अश्लीलतेचे माध्यम ?’ या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष संवादात बोलत होते.

सतीश कल्याणकर पुढे म्हणाले, ‘सेन्सॉर बोर्डवर पूर्वीपासूनच योग्य आणि जाणकार व्यक्ती नेमलेल्या नाहीतदेशसमाजसंस्कृती यांविषयी आपली काय जबाबदारी आहेयांविषयी काय कायदे आहेतहे सेन्सॉर बोर्डवर असणार्‍या लोकांना माहीत आहे का मी यापूर्वीच केंद्र सरकारकडे याविषयी पत्रव्यवहार केला आहेसेन्सॉर बोर्डवर नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचे प्रावधान असतानाही त्यांना कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाहीहे धक्कादायक आहेसेन्सॉर बोर्डच्या प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्यांना तिथे काम करण्याची अनुमती द्यावी.’

 ‘भारत वॉइस’च्या संस्थापिका गायत्री एन्. म्हणाल्या, ‘चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड आहेमात्र वेब सिरीज/.टी.टी.साठी हे लागू झालेले दिसत नाहीवेब सिरीजमधील संवादांत शिवराळ भाषादाखवण्यात येणारी हिंसा यांमुळे ते पाहून भारत आणि विदेशांतील लहान मुलेही त्याचे अनुकरण करत आहेतहे थांबायला हवे.’  

हिंदु जनजागृती समितीच्या प्रवक्त्या ॲडअमिता सचदेवा म्हणाल्या, ‘आज वेब सिरीजमधून हिंसेला प्रोत्साहन दिले जात आहेवेब सिरीजमध्ये हिंदु धर्मदेशाचे सैन्य आदींविषयी चुकीचे चित्रण दाखवले जातेयांसाठी सेन्सॉर बोर्ड नाहीयासंदर्भात हिंदु जनजागृती समिती गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन लढा देत आहेवेब सिरीजविषयी जोपर्यंत सरकार ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील.’