Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी गुढी पाडव्याचे महत्त्व नमूद केले आहे, ज्या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते.  गुढी पाडव्यापासून उष्ण दिवस सुरू होतात व वसंत ऋतूचे आगमन होते.

डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणतात, गुढी पाडव्यासारखे सण भारताची खास संस्कृती समजून घेण्याची व साजरा करण्याची संधी देतात. ते पुढे म्हणतात, हा सण म्हणजे सर्वांसाठी सुख, शांती व समृद्धीचे द्योतक आहे.

“गुढी पाडव्याच्या निमित्ताने मी गोमंतकीय जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. हा सण सर्वांसाठी सुख, चांगले आरोग्य व समृद्धी घेऊन येवो. आपली खास संस्कृती व परंपरा समजून घेण्याची व साजरा करण्याची ही संधी आपण घेऊया,” असे मुख्यमंत्री म्हणतात.

ते पुढे म्हणतात, गोमंतकीयांनी आपल्या आयुष्यात आत्मनिर्भरतेची नवीन ऊर्जा भरावी आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ च्या ध्येयासाठी अधिक मेहनत करावी. या नवीन वर्षात समाज प्रगतीची नवीन शिखरे गाठेल अशी शा त्यांनी व्यक्त केली.

आपल्या संदेशाच्या शेवटी मुख्यमंत्री येत्या वर्षात सर्वांना यश व चांगले आरोग्य चिंतीतात.