Connect with us

गोवा खबर

पेडणे येथे आज “हँडस अप” नाटक

Published

on

Spread the love

 

गोवा खबर : पेडणे येथे नटवर्य स्व. प्रभाकर पणशीकर स्मृती  महोत्सव आयोजित केला असून आज शनिवार दि १८ मार्च  रोजी सायंकाळी ठीक ७. ०० वा ‘अ ‘गट राज्यनाट्य स्पर्धेतील तृतीय क्रमांक पारितोषिक विजेते व गोवा राज्य ब गटराज्यनाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे तिन्ही पारितोषिक प्राप्त संस्था सातेरी कलामंदिर हसापुर, गोवा प्रस्तुत व प्रसिद्ध नाटककार वसंत कामत  लिखीत दोन अंकी नाटक “हँडस अप”  सादर होईल.
“सातेरी कलामंदिर “हसापूर गोवा प्रस्तुत या नाटकाचे दिग्दर्शन गोविंद नाईक यानी केले असून सूत्रधार सुहास मळीक,असून  पार्श्वसंगीत जवाहर बर्वे यांचे आहे, नेपथ्य चंद्रशेखर बर्वे  व् प्रकाशयोजना अनिमेश सावंत  यांची असून वेशभूषा सुहाना मळीक , रंगभूषा राजेंद्र हरमलकर ,तर सहाय्यक सावळाराम नाईक, चैतन्य गवस, नितेश नाईक ,संकल्प नाईक संजय नाईक आहेत .
यात निलेश नारायण नाईक,गोविंद नाईक,अरविंद नाईक,प्रजय मळीक,,अंकिता गवस, मैथिली मराठे,सुहास मळीक दिया मळीक यांच्या भूमिका आहेत. चोखंदळ नाट्यरसिकांनी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे अहवान संस्थेने केले आहे.