गोवा खबर: गोवा राज्य निवडणूक आयोगाने उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील वेळगे ग्रामपंचायतीच्या वार्ड-क्र ५ आणि वनमांवळिंगे-कुडचीरे ग्रामपंचायतीचा वार्ड-क्र.६ साठी २५ मार्च २०२३ रोजी पोटनिवडणूक जाहीर करून आचारसंहिता लागू केलीआहे.
या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यानी पोटनिवडणूक जाहीर झालेल्या आणि निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या ग्रामपंचायत वार्डांतील सर्व दारूची दुकाने, पब्स, क्लब्स, शॅक्स किंवा काणतीही दारू विक्री आस्थांपने आचारसंहिता लागू असलेल्या काळांत प्रत्येक दिवशी रात्री १० नंतर बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनाविरूध्द अबकारी खात्याच्या भरारी पथकाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.