Connect with us

गोवा खबर

दयानंद बांदोडकर यांच्यावरील मराठी पुस्तकाचे १२ मार्च रोजी प्रकाशन

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत श्री दयानंद बांदोडकर यांच्यावरील मराठीतील “भाऊ आठवांचा पारिजात” या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पुस्तक त्यांची धाकटी कन्या ज्योती बांदेकर यांनी लिहले आहे. 

 

रविवारी १२ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे प्रकाशन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. तर प्रसिद्ध लेखक श्री सोमनाथ कोमरपंत हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील.

 

सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ज्योती बांदेकर म्हणाल्या की,  “मी शाळकरी मुलगी असताना माझे वडील भाऊसाहेब यांच्यावर कविता आणि लेख लिहायचे. या सर्जनशील उपक्रमांचे कुटुंबीयांनी कौतुक केले. या वेगळ्या आणि आनंदी स्मृतीमुळेच मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.”

ज्योतीताईंच्या मते, त्यांच्या दिवंगत वडिलांबद्दल आणि त्यांच्या राजकीय जीवनाबद्दल बरेच काही लिहिले गेले असले तरी, त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाबद्दल फारच कमी छापले गेले आहे.

 

त्या म्हणाल्या की, “हे पुस्तकातून मी भाऊसाहेबांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाबद्दल माझ्या लक्षात असलेले अनेक संस्मरणीय किस्से आणि घटनांमधून लिहिण्याचा प्रयत्न आहे. मला खात्री आहे की वाचकांना हे पुस्तक आवडेल,”.

 

ज्योती बांदेकर या गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री स्व.शशिकलाताई काकोडकर यांच्या धाकट्या बहीण आहेत. त्या वास्को स्थित उद्योजिका आहेत. तसेच माजी अध्यक्ष आणि ३० वर्षांपासून सिटीझन कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालक तसेच अन्य अनेक व्यवसायांच्या प्रमुख आहेत.

प्रशिक्षित शास्त्रीय गायिका आणि कलाकार असणाऱ्या ज्योतीताईंनी गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.