गोवा खबर:पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 तर्फे 28.03.2023 रोजी दुपारी 12:00 वाजता पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी 403001 येथे 53 व्या क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा क्षेत्रातील 6 आठवड्यांत निपटारा न झालेल्या टपाल खात्याच्या सेवांसंबंधित समस्या आणि तक्रारींचे निराकरण ही डाक अदालत करेल. मेल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक सेवा आणि मनी ऑर्डरचे पैसे चुकते न होणे यासंबंधीच्या तक्रारींचा यावेळी विचार केला जाईल.
गोवा विभागातील टपाल सेवांबाबत तक्रार करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी त्यांची तक्रार प्रतीसह यू. विजयकुमार, सचिव, डाक अदालत आणि सहाय्यक संचालक पोस्टल सेवा-I, 0/o पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांच्याकडे कृपया पाठवावी. 15.03.2023 रोजी किंवा त्यापूर्वी मूळ तक्रार ज्या अधिकार्यांकडे केली होती त्याची तारीख, अधिकाऱ्यांचे नाव आणि पद यासारख्या तपशीलांचा तक्रारीत समावेश असावा.
कोणत्याही अधिक तपशीलासाठी किंवा शंकांसाठी, इच्छुक व्यक्ती पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा प्रदेश, पणजी 403001 यांच्याशी संपर्क साधू शकतात.
डाक अदालत विषयी
प्रत्येक नागरिकाच्या जीवनात प्रभावशाली अशा देशाच्या सामाजिक-आर्थिक जीवनात टपाल सेवा बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची टपाल खाते दखल घेते. विभाग आपल्या ग्राहकांना समाधानकारक सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करत असताना, संपर्कातील अंतर आणि सेवेतील त्रुटी उद्भवू शकतात, ज्याचे पर्यावसन समस्या आणि तक्रारीत होते. अशा समस्या आणि तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण आणि निपटारा करण्यासाठी वेळोवेळी अदालतींचे आयोजन केले जाते.