Connect with us

गोवा खबर

१५ ते २० डिसेंबरपासून सांताक्रुझ येथे पारंपारिक स्टार (नोकेत्रा) कार्यशाळा

Published

on

Spread the love

गोवा खबर:सांताक्रुझ हायस्कूल, आणि सांताक्रुझ माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कला आणि संस्कृती संचालनालयाने १५ वर्षांवरील विद्यार्थी, युवक आणि सामान्य लोकांसाठी “पारंपारिक स्टार (नोकेत्रा) मेकिंग कार्यशाळा” सांताक्रुझ येथे आयोजित केली आहे.

या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून विद्यार्थी व युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर केवळ ३०-४० स्पर्धकांनाच सहभागी केले जाईल. कार्यशाळेदरम्यान सहभागींना अल्पोपाहार/स्नॅक्स दिला जाईल. प्रवेश शुल्क रु. १००/- प्रति सहभागी शुल्क आकारले जाईल. कार्यशाळेसाठी सहभागींनी कात्री, चाकू इत्यादी आणावेत.

इच्छुक उमेदवारांना १४ ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत संस्कृती भवन, पट्टो, पणजी-गोवा येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून दिलेला फॉर्म भरावा लागेल. रीतसर भरलेले अर्ज १५ डिसेंबर २०२२ पर्यंत कला आणि संस्कृती संचालनालयाकडे सादर करावे लागतील.