Connect with us

गोवा खबर

डब्ल्यूएसीमधील आरोग्य एक्स्पोला मोठ्या संख्येने दर्शकांची भेट

Published

on

Spread the love

पश्चिमेमध्ये आयुर्वेदासाठी मार्केट वेगाने वाढत आहे

 

गोवा खबर: पश्चिमेमध्ये आयुर्वेद उत्पादने व सेवांना असलेले मार्केट वेगाने वाढत आहे, कारण आजच्या जगामधील आरोग्य आव्हानांना हाताळण्यासाठी सर्वांगीण पारंपारिक आरोग्य देखभाल उपायांबद्दल जागरूकता वाढत आहे, असे मत आरोग्य एक्स्पोमधील सहभागींनी व्यक्त केले. इथे गुरुवारी सुरू झालेल्या जागतिक आयुर्वेद परिषदेचा (डब्ल्यूएसी) भाग म्हणून ह्या एक्स्पोचे आयोजन केले जात आहे.

“आताचा काळ आयुर्वेदाचा आहे. जगाला निरोगी ठेवण्यासंदर्भात पारंपारिक आरोग्य देखभाल प्रणालींच्या मौल्यवान भुमिकेबद्दल पश्चिमेतील अधिकाधिक लोक जागरूक होत आहेत,” असे अलवेदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेतीस बुलिटस ह्यांनी म्हंटले. अलवेदा हा मंच भारतातील आघाडीच्या आयुर्वेद व्यावसायिकांसोबत जगभरातील लोकांना जोडतो.

“सुरुवातीला पश्चिमेतील अनेक लोक पारंपारिक आरोग्य उपायांबद्दल साशंक होते. जेव्हा पाश्चात्य जगात योग आणि ध्यानाचा प्रसार झाला तेव्हा अनेकांना असे वाटले की, ह्या प्रणाली विशिष्ट श्रद्धा प्रणालीशी संबंधित आहेत. परंतु कालांतराने ह्या गैरसमजांच्या जागी स्वीकृती आली. हेच आयुर्वेदाच्या बाबतीतही झाले,” असे स्विट्झर्लंडचे श्री. बुलिटस ह्यांनी म्हंटले.

भारत आणि विदेशामध्ये आयुर्वेदाच्या प्रसारामध्ये भारत सरकारचे आयुष मंत्रालय “विलक्षण उत्तम काम” करत आहे, असे म्हणून श्री. बुलिटस ह्यांनी म्हंटले की, डब्ल्यूएसीच्या ह्या परिषदेमुळे हा संदेश प्रभावी प्रकारे दिला जाईल.

डब्ल्यूएसीच्या नवव्या आवृत्तीची आणि आरोग्य एक्स्पोची मुख्य थीम पूर्णपणे साईड इफेक्टसपासून मुक्त असलेल्या आरोग्यदायी उत्पादनांसाठी संपूर्ण समाज म्हणून पुढे जाऊन रोगप्रतिकार शक्तीला चालना देणा-या ह्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या स्वास्थ्य प्रणालीच्या क्षमतेला साकार करणे, हे आहे, असे आघाडीची आयुर्वेद संस्था असलेल्या श्री धूतपापेश्वर लि. च्या उत्पादन व्यवस्थापिका डॉ. पूनम दाभोलकर ह्यांनी म्हंटले.

 

“वैचारिक चर्चांशिवाय ह्या परिषदेमध्ये सामान्य लोकांना आयुर्वेदाबद्दल पुरेशी स्पष्ट कल्पना येईल व त्यासंदर्भातील गैरसमज दूर होतील. ही वैज्ञानिक प्रणाली पूर्णपणे “ग्रंथोक्त” आहे व शतकांपासून तिने आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे. हा संदेश डब्ल्यूएसीने स्पष्टपणे दिला आहे,” असे डॉ. दाभोलकर ह्यांनी म्हंटले.

दिल्लीमधील ध्यान फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी म्हंटले की, लोकांना शारीरिक व मानसिक दृष्टीने निरोगी जीवन जगता येण्यासाठी आयुर्वेदाची सांगड योगासोबत घालणे आवश्यक आहे.

“आयुर्वेद हा योगाशी अतिशय जवळून निगडीत आहे. परंतु व्यक्तीने अतिशय शुद्ध स्वरुपात व भेसळरहित प्रकारे योगाचा अभ्यास करणे गरजेचे आहे,” असे डब्ल्यूएसीमध्ये सहभाग घेणा-या ध्यान फाउंडेशनच्या स्वयंसेविका मिस. नंदिनी घोष आणि मिस. रिमा ह्यांनी म्हंटले.

आयुष मंत्रालय आणि गोवा सरकारच्या सहकार्यासह विज्ञान भारतीचा उपक्रम असलेल्या वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशनद्वारे ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.

आघाडीच्या आयुर्वेदिक आरोग्यदेखभाल प्रदात्यांकडून देण्यात येणा-या अनेक उत्पादनांची व सेवांची माहिती देणा-या ह्या एक्स्पोला डब्ल्यूएसीसह गुरुवारी त्याचा शुभारंभ झाल्यानंतर दर्शक सातत्याने भेट देत आहेत. सर्व चारही दिवशी ह्या एक्स्पोला नि:शुल्क प्रवेश देण्यात आला आहे.

आघाडीच्या आयुर्वेदिक संस्थांद्वारे देण्यात येणारी मोफत ओपीडी सेवा हे ह्या एक्स्पोचे एक विशेष आकर्षण आहे.

Continue Reading