Connect with us

गोवा खबर

आयर्नमॅन ७०.३ गोवा मध्ये सर्व सदस्यीय महिला असणारे २० रिले संघ सहभागी होतील

Published

on

Spread the love

 

गोवा खबर: रविवार, १३ नोव्हेंबर रोजी पणजी येथे होणाऱ्या आयर्नमॅन ७०.३ गोवा शर्यतीत वीस सर्व सदस्यीय महिला रिले संघ सहभागी होतील. ब्रिगेड फाऊंडेशन, बेंगळुरू यांच्या सहकार्याने आयर्नमॅन ७०.३  शर्यतीचे आयोजक योस्काच्या ‘वुमन इन स्पोर्ट’ उपक्रमाचा हा भाग आहे. ज्यामुळे या महिला रिले संघांची मोफत नोंदणी करणे शक्य झाले आहे.

आयर्नमॅन ७०.३ शर्यतीत महिला आणि पुरुष ट्रायथलीट्स ११३ किलोमीटरचा खडतर प्रवास निर्धारित साडेआठ तासांत पूर्ण करतील. यामध्ये १.९ किमी समुद्रात पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावण्याचा समावेश आहे.

मंगळवारी शहरात जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात मध्ये आयर्नमॅन ट्रायथलीट आणि योस्का संस्थापक दीपक राज म्हणाले की, “योस्कामध्ये आम्ही नेहमीच महिला खेळाडू तसेच महिलांनी खेळात यावे यासाठी प्रोत्साहन देत असतो. महिला सक्षमीकरण करण्यासाठी आणि आयर्नमॅन ७०.३ गोवा शर्यतीच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये महिला खेळाडूंचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आम्ही मोफत नोंदणी सुरू करण्याचा करण्याचा निर्णय घेतला.

दीपक राज म्हणाले की,  योस्का संघाने भारतभरातील जलतरणपटू, सायकलपटू आणि धावपटूंकडून अथक परिश्रम घेऊन नंतर सर्व सदस्यीय महिला रिले संघ तयार केले. ब्रिगेड फाउंडेशनच्या विश्वस्त निरुपा शंकर यांनी आतापर्यंत दहा महिला रिले संघाना मदत केली आहे. त्या म्हणाल्या की, “ब्रिगेड या स्पर्धेच्या कट्टर समर्थक आहेत.

महिलांना खेळात प्रोत्साहन देऊन, आम्ही त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची तसेच अधिक उंची गाठण्याची संधी देऊन त्यांच्या जीवनाचा दर्जाही वाढवत आहोत.”

योस्काच्या आयर्नमॅन प्रमाणित महिला प्रशिक्षकांपैकी एक आणि “वूमेन इन स्पोर्ट” उपक्रमाच्या चालक आरती स्वामीनाथन म्हणाल्या, “ हा उपक्रम अधिक महिलांना स्वतःला शोधण्यासाठी , अनुभव घेण्याची आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी देतो.”