केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक
गोवा खबर:केंद्रीय माहिती व प्रसारण आणि मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय खात्याचे राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन गोवा दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्री 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतील. याप्रसंगी इफ्फीच्या तयारीशी संबंधित विविध विभागाचे प्रतिनिधी सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती देणार आहेत.
त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ मुरुगन मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथील विविध प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. याप्रसंगी डॉ मुरुगन एमएफव्ही सागरीका आणि एमएफव्ही यलोफीन या सर्वेक्षणासाठीच्या जहाजांची आणि मुरगाव बंदरातली मासेमारी क्षेत्राची पाहणी करणार आहेत.