Connect with us

गोवा खबर

चित्रपूर सारस्वत ब्राह्मण समाजाच्या ‘अरण्य कुटीर’चे कुंडई येथे उद्घाटन

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर: चित्रपूर सारस्वत (सीएसबी) समुदायाचे आध्यात्मिक प्रमुख परमपूज्य श्रीमत सद्योजत शंकराश्रम स्वामीजी यांनी रविवारी सकाळी फोंडा तालुक्यातील कुंडई येथे “अरण्य कुटीर” या समुदायाच्या आरोग्य आणि ध्यान केंद्राचे उद्घाटन केले.

 

श्री चित्रपूर मठ चॅरिटेबल ट्रस्ट (एससीएमसीटी) च्या अरण्य कुटीर प्रकल्पामध्ये योगाचे अभ्यासक्रम चालवले जातील. यामध्ये योगिक श्वासोच्छ्वास आणि ध्यान यांचा समावेश आहे. केंद्राच्या बांधलेल्या क्षेत्रामध्ये एक लहान ५०० चौरस मीटर निवासी क्षेत्र आणि एक मोठे वृक्षारोपण जागेचा समाविष्ट आहे.  यामध्ये ११०० हून अधिक विविध औषधी, सुगंधी, फुलांची आणि फळझाडे आहेत. वृक्षारोपणामुळे खडकाळ भूभाग हिरवागार होण्यासोबतच मातीची धूप रोखण्यात मदत झाली आहे. या प्रकल्पामध्ये इष्टतम पाणी वापरासाठी पावसाचे पाणी साठवण आणि ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.

विशेष म्हणजे, सीएसबी समुदाय ज्याची संख्या संपूर्ण भारत आणि जगभरात फक्त २३,००० आहे, त्यांचे मूळ गोव्यात आहे. सीएसबी पूर्वी गौड सारस्वत ब्राह्मण होते आणि ते १० व्या शतकात गोव्यात (पूर्वीचे गोमंतक) स्थायिक झाले होते. १६ व्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी हिंदूंचे जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यास सुरुवात केल्यानंतर या समाजातील बहुसंख्य लोक कन्नड भाषिक प्रांतांमध्ये स्थलांतरित झाले. आणि सीबीएस यांनी उत्तर कर्नाटकातील शिराळी गावात त्यांचे विस्थापन केले असले तरी गोव्याच्या फोंडा तालुक्यातील मंगेशी, शांतादुर्गा आणि महालक्ष्मीच्या मंदिरांद्वारे समुदाय त्यांच्या कुलदेवतांशी (कुटुंब देवतांशी) कायमचा जोडला गेला आहे.

 

सीएसबी समुदायाने राष्ट्रीय सहकारी चळवळीचा पुढाकार घेतला.  त्यांनी गामदेवी, मुंबई येथे आशियातील पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था आणि भारतातील पहिल्या सहकारी बँकांपैकी एक – एसव्हीसी बँक लिमिटेडची स्थापना केली. लहान सीएसबी समुदायामध्ये भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या सदस्यांपैकी एक असणारे सर बेनेगल नरसिंग राऊ, भारतीय रिझर्व्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर सर बेनेगल रामा राऊ, कुटीर उद्योग आणि हस्तकला चळवळीच्या संस्थाप श्रीमती कमलादेवी धारेश्वर चट्टोपाध्याय, इन्फोसिस लिमिटेडचे ​​नंदन निलेकणी, बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोण आणि चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

शिराळी येथील चित्रपूर मठानेही आपल्या अनेक सामाजिक कार्यक्रमांनी स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे . त्यांनी मोफत शाळा चालवणे, वृद्धाश्रम चालवणे, सर्व समुदायांना मोफत जेवण देणे, मोफत वैद्यकीय दवाखाने, धरण बांधणे, विहिरींचे पुनर्भरण करणे, गावांना पिण्यायोग्य पाणी देणे,  नैसर्गिकरित्या पिकवलेल्या भाजीपाला आणि तांदूळ, पाणी साठवणीचा सराव, वृक्ष लागवड आणि गांडूळ आणि गोबर गॅस प्लांटचा वापर. मठ त्यांच्या पुरस्कार विजेत्या, ‘संवित सुधा’ व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उत्तर कर्नाटकातील खेड्यातील महिलांना शिकण्याची आणि कमाईची सुविधा देखील प्रदान करते.