Connect with us

गोवा खबर

अभाविप आणि जिज्ञासा गोवा तर्फे द्रव्यगुण मोहीम संपन्न ; चंद्रेश्र्वर भूतनाथ पर्वतावर विद्यार्थ्यांचे गिर्यारोहण

Published

on

Spread the love
गोवा खबर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण गोवा व जिज्ञासा गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रेश्र्वर भूतनाथ पर्वतावर दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी द्रव्यगुण मोहीम गिर्यारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी *द्रव्यगुण तज्ञ डॉ नागराज सामगा सर (MD द्रव्यगुण)* यांच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहण करताना विविध औषधी वनस्पती ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमासाठी गोव्याच्या विविध महाविद्यालयातील तब्बल ८० विद्यार्थी व ६ प्राध्यापकांनी  सहभाग घेतला.
“निसर्गाने आपल्याला दिलेल्या साधन संपत्ती मध्ये औषधी वनस्पतीचे बहुमूल्य स्थान आहे” असे डॉ नागराज सामगा यांनी सबोंधिले. “अभाविप जिज्ञासाच्या माध्यमातून आयुर्वेद समाजात पोहोचवण्याचे काम करत असते” असे अभाविप दक्षिण गोवा जिल्हा संयोजक पवनराज सावंत देसाई यांनी विद्यार्थ्यास सांगितले तसेच. “विद्यार्थ्यांनी मनात राष्ट्रभाव निर्माण करून समाजासाठी काम केले पाहिजे” असे सांगत अभाविप गोवा संघटन मंत्री गोविंद देशपांडे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रेवती बनकर यांनी केले . सदर कार्यक्रमासाठी अभाविप चे अक्षय शेठ, अवनी शिंदे, रविंद्र गुरव ,सर्वेश तलवडकर  ई .कार्यकर्ते उपस्थित होते.