Connect with us

गोवा खबर

टीव्‍हीएस मोटर कंपनीकडून गोव्‍यामध्‍ये अनेक उत्‍साहवर्धक वैशिष्‍ट्यांनी युक्‍त नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब इलेक्ट्रिक स्‍कूटर्स लाँच

Published

on

Spread the love

 

  • नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब सिरीजमध्‍ये अनेक दर्जात्‍मक कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये आहेत, जसे वैयक्तिकृत थीम्‍स, म्‍युझिक प्‍लेअर कंट्रोल, वॉईस असिस्‍ट व टीव्‍हीएस आयक्‍यूब अॅलेक्सा स्किलसेट, वेईकल हेल्‍थ आणि सुरक्षितता व ओटीए अपडेट्स
  • टीव्‍हीएस आयक्‍यूब आणि टीव्‍हीएस आयक्‍यूब एस मध्‍ये १०० किमीची सुधारित ऑन-रोड रेंज आहे, तर टीव्‍हीएस आयक्‍यूब एसटी एका चार्जमध्‍ये १४० किमीची दर्जात्‍मक ऑन-रोड रेंज देईल

 गोवा खबर: टीव्‍हीएस मोटर कंपनीने आज गोव्‍यामध्‍ये शहरातून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाल्‍यानंतर दर्जात्‍मक ऑन-रोड रेंज देणाऱ्या नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब इलेक्ट्रिक स्‍कूटर सिरीजचे अनावरण केले. या स्‍कूटर्समध्‍ये अनेक इंटेलिजण्‍ट कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ७ इंच टीएफटी टचस्क्रिन व क्‍लीन यूआय, अनेक थीम वैयक्तिकरण, वॉईस असिस्‍ट व टीव्‍हीएस आयक्‍यूब अॅलेक्‍सा स्किलसेट, सर्वोत्तम म्‍युझिक प्‍लेअर कंट्रोल, ओटीए अपडेट्स, चार्जरसोबत प्‍लग-अॅण्‍ड-प्‍ले कॅरी चार्जिंग, वेईकल हेल्‍थ व सेफ्टी नोटिफिकेशन्‍स, अनेक ब्‍ल्‍यूटूथ व क्‍लाऊड कनेक्‍टीव्‍हीटी पर्याय, ३२ लिटर स्‍टोरेज स्‍पेस आणि इतर अनेक.

प्रबळ व विश्‍वसनीय टीव्‍हीएस मोटरच्‍या अभियांत्रिकी क्षमतांच्‍या पाठबळासह टीव्‍हीएस आयक्‍यूबची प्रबळ चाचणी करण्‍यात आली आहे, ज्‍याला उत्तमरित्‍या स्‍थापित नेटवर्क सपोर्ट, रिलेशनशिप मॅनेजर व सर्वांगीण डिजिटल परिसंस्‍थेचे पाठबळ आहे.

टीव्‍हीएस मोटर कंपनीच्‍या फ्यूचर मोबिलिटीचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. मनू सक्‍सेना म्‍हणाले, ‘’विद्यमान नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब सिरीज ग्राहकांच्‍या मोठ्या समूहाला अधिक निवडी देते. नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब सिरीजमध्‍ये उच्‍च रेंज, तसेच अनेक चार्जिंग पर्याय आणि दर्जात्‍मक डिस्‍प्‍ले व यूआय पर्याय आहेत. याव्‍यतिरिक्‍त या सिरीजमध्‍ये आधुनिक कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये, अॅप्‍लीकेशन्‍स व कनेक्‍टेड ऑन-डिवाईस अनुभव समाविष्‍ट आहे. आम्‍ही टीव्‍हीएस मोटरची दर्जाबाबत कटिबद्धता अधिक दृढ करण्‍यासाठी आमच्‍या व्यापक आरअॅण्‍डडी व सत्‍यापन प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब विकसित केली आहे. आमचा दृढ विश्‍वास आहे की, आमचे व्‍यापक नेटवर्क व परिसंस्‍थेसह आम्‍ही ग्राहकांना उच्‍च दर्जाचे समाधान व हमी देऊ.’’

टीव्‍हीएस आयक्‍यूब सिरीज ११ रंग व ३ चार्जिंग पर्यायांमधील ३ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येते.