Connect with us

गोवा खबर

भाजपचा विजय सरदेसाई यांना धक्का ; मॉडेल मडगावचे सात, फातोर्डा फॉरवर्डचा एक नगरसेवक भाजपामध्ये दाखल

Published

on

Spread the love
 गोवा खबर:मडगाव नगरपालिकेच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली. मडगावचे आमदार यांच्या मॉडेल मडगाव पॅनलच्या ७ नगरसेवकांनी आणि आमदार विजय सरदेसाई यांच्या फातोर्डा फ्रोरवर्डच्या एका नगरसेवकाने आज दि. ९ रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. 
भाजपाच्या मुख्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यास आमदार दिगंबर कामत, माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदार कामत यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये दामोदर शिरोडकर, दीपाली सावळ, संड्रा फर्नांडिस, दामोदर वरक, सीताराम उर्फ सिद्धार्थ गडेकर, सगुण नाईक, लता पेडणेकर यांचा तर सरदेसाई यांचे समर्थक नगरसेवक राजू नाईक यांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून मडगाव नगराध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या राजकीय लढाईत आमदार कामत यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच फातोर्डा फॉरवर्ड चा नगरसेवक फोडून विजय सरदेसाई यांना जोरदार धक्का दिला आहे.