गोवा खबर:उत्तर गोव्यातील रेईस – मागुश आणि दक्षिण गोव्यातील दवर्ली जिल्हा पंचायतीची पोट निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा भाजपाने या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात उत्तर गोव्यातील रेईस – मागुश जिल्हा पंचायतीच्या जागेसाठी पिळर्ण येथील संदीप काशिनाथ बांदोडकर तर दक्षिण गोव्यातील दवर्ली जिल्हा पंचायतीसाठी परेश पांडुरंग नाईक यांच्या नावांचा समावेश आहे.
परेश नाईक पंच सदस्य असून गेली सहा वर्षे ते उपसरपंच पद सांभाळत आहेत. तसेच भाजपाच्या नावेली मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. तर संदीप बांदोडकर गेली चार टर्म पंच सदस्य म्हणून कार्यरत असून त्यांनी सरपंचपदीही काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.