Connect with us

गोवा खबर

प्रजासत्ताक दिन मिरवणूकीस उपस्थित राहण्यासाठी आदिवासी प्रतिनिधींना निमंत्रण

Published

on

Spread the love

 गोवा खबर:भारत सरकारने नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन मिरवणूकीस उपस्थित राहण्यासाठी राज्यातील अनुसूचित जमातीतील एक पुरुष आणि एक महिला अशा दोन आदिवासी प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे.

निवडलेल्या व्यक्तीने पारंपारिक पोशाखात स्वतःचे प्रतिनिधित्व केले पाहिजे आणि २२ जानेवारी  ते २  फेब्रुवारी २०२३  पर्यंत दिल्लीत त्यांचे वास्तव्य असेल. गोवा ते दिल्ली आणि परत जाण्यासाठी विमानाने, रेल्वेने जाण्याचा प्रवासाचा खर्च तसेच जेवणाची सोय राज्य सरकार करणार. गोवा राज्यातील पात्र व्यक्ती ज्यांचे वय साठ वर्षांपेक्षा जास्त नसेल त्यांनी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत संचालक, आदिवासी कल्याण संचालनालय, श्रमशक्ती भवन, ५ वा मजला, पाट्टो, पणजी गोवा येथे खाली दिलेल्या नमुन्यात आपले नामांकन सादर करावे.

प्रोफॉर्मा खालील प्रमाणे आहे:- आदिवासी अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, वय, वडिलांचे नाव, आईचे नाव, पती, पत्नीचे नाव, संपूर्ण रहिवासी पत्ता, संपर्क क्रमांक, तो, ती ज्या जमातीशी संबंधित आहे (जातीचे प्रमाणपत्र संलग्न केले पाहिजे) आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न.