गोवा खबर: राज्यपाल श्री. पीएस. श्रीधरन पिल्लई २९ सप्टेंबर २०२२ रोजी “गोवा संपूर्ण यात्रा” चा एक भाग म्हणून कळंगुट आणि शिवोली मतदारसंघात पूर्ण दिवसाचा दौरा करणार आहेत.

कळंगुट, कांदोळी, पर्रा, हडफडे, नागोवा, शिवोली, अंजुणा, सोडयें, मार्ना, ओशेल, आसगांव, वेर्ला-काणका येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन ते सरपंच व पंचांशी संवाद साधणार आहेत.
ते नूतनीकरण केलेल्या फोर्ट आग्वाद कारागृहालाही भेट देणार आहेत आणि पर्यटन उद्योगातील भागधारकांशी संवाद साधणार आहेत.