गोवा खबर:सुधारित नगर नियोजन कायदा गोव्यासाठी विनाशकारी असून सुधारित कायदा रद्द करण्याची मागणी आम आदमी पक्षाने सोमवारी केली.
आप बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस, वेळ्ळीचे आमदार इंजिनियर क्रुझ सिल्वा आणि आप नेते अलिना सालढाणा, वाल्मिकी नाईक आणि सुरेल तिळवे, सोमवारी पाटो येथील नगर नियोजन कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला.
कॅप्टन व्हेंझी व्हिएगस म्हणाले, “या प्रकरणात, आम्ही वाटाघाटी करू इच्छित नाही. या दुरुस्तीचा उद्देश गोव्याला लुटणे हा आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी गोल्फ कोर्सची गरज नाही. आमचे खजान आणि शेतजमिनी अशा प्रकल्पांसाठी नाही. गोव्यात अनेक हॉटेल्स आणि विद्यमान व्यवसाय आहेत ज्यांचा विकास करणे आवश्यक आहे”.
आप आमदार अभियंता क्रुझ सिल्वा म्हणाले, “राज्यातील अनेक भागांमध्ये रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. चांगले रस्ते बांधण्यासाठी गोवा सरकार वारंवार कमी पडले. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अशा समस्यांवर काम करण्याऐवजी, सरकारला मोठे प्रकल्प विकासाच्या नावाखाली आणायचे आहेत”.
आप नेत्या अलिना सालढाणा म्हणाल्या, “गोव्यासारख्या छोट्या राज्यात असे घातक प्रकल्प राबविण्यापूर्वी राज्याची क्षमता किती आहे यावर सरकारने विचार केला पाहिजे. गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजप सरकारने विकासाच्या नावाखाली गोव्यातील पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प आणले आहेत. सरकार जनतेच्या सेवेसाठी आहे त्यामुळे जनतेला जे हवे आहे त्यानुसारच त्यांनी काम केले पाहिजे.”
कॅप्टन व्हेंझी यांनी नंतर नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना लोकांच्या जोरदार विरोधाची माहिती दिली. तसेच सुधारित
कायदा मागे घेण्याची मागणी केली. आप आमदाराने
गोवा राज्य पर्यावरण-संवेदनशील भूमी असून सुधारित कायदामुळे उद्भवलेल्या जोखमीचा उल्लेख केला आणि मंत्री विश्वजीत राणे यांना दुरुस्त्या स्थगित ठेवण्यास प्रवृत्त केले.