गोवा खबर:गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्याने हर घर तिरंगा स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष राष्ट्र उभारणीसाठीच्या आमच्या वचनबद्धतेचे मूर्त स्वरूप म्हणून साजरे करण्यासाठीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत सुरू केलेल्या “हर घर तिरंगा” मोहिमेचा एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
खात्याला त्यांच्या विविध सोशल मीडियावरून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

हर घर तिरंगा स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत:- पहिले बक्षीस रु. ७,५००/- चे श्री.अक्षय अमृत वळवईकर यांना, द्वितीय पारितोषिक रु. ५,०००/- चे श्री .शरद पाटील यांना तर रूपये . ३०००/- चे तृतीय पारितोषिक मिस स्नेहा पै लोटलीकर यांना प्राप्त झाली.
प्रत्येकी रूपये २००० हजारांची पाच उत्तेजनार्थ पुरस्कारांचे विजेते आहेत श्री कुंदन कश्यप, मिस रंजना मलिक, श्री चेतन मडकईकर, मिस कल्पिता योगेश पोतदार आणि मिस सान्वी गावस.
हर घर तिरंगा” मोहिमेतील विजेत्यांना माहिती आणि प्रसिध्दी खात्यातर्फे १६ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रमाणपत्र आणि बक्षिसे दिली जातील.