गोवा खबर:विज्ञान आणि पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री नीलेश काब्राल यांनी साळगांव बार्देश येथे आयोजित कार्यक्रमात गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सभागृहाचे उदघाटन केले.
या प्रसंगी बोलताना श्री. काब्राल यांनी येणाऱ्या पिढीला स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. सर्व प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले आणि या दिशेने सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. मंत्र्यांनी पुढे बोलताना एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या हानिकारक प्रभावांबद्दल सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व सांगितले. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा लघुपट “नो टू सिंगल युज ऑफ प्लॅस्टिक” च्या निर्मितीद्वारे केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. गोवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि राज्याला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी व राज्यातील प्रदूषण रोखण्यासाठी जीएसपीसीबीच्या पुढाकाराचे कौतुक केले.

पर्यावरण सचिव श्री अरुण कुमार मिश्रा, आयएएस यांनी आपल्या भाषणात सर्व प्रकारचे प्रदूषण दूर करण्याच्या गरजेवर भर दिला. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी ते पुरेसे नाही या प्रयत्नात जनतेचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे असे ते म्हणाले. आपले जलस्रोत प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि आपले राज्य स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी जनतेने सरकारला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
सदस्य सचिव, पीसीबी, श्रीमती. शमिला मोंतेरो यांनी इज ऑफ डुइंग बिझनेस आणि जीएसपीसीबी इनिशिएटिव्ह्ज या विषयावर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन दिले.
शास्त्रज्ञ, श्रीमती. जेनिका सिक्वेरा, विविध कंपन्यांचे अधिकारी, गोवा राज्य प्रदूषण मंडळाचे कर्मचारी आणि इतर उपस्थित होते.
श्री चेतन उपाध्ये यांचा लघुचित्रपटासाठी स्क्रिप्ट लेखन आणि प्लॅस्टिकचा एकेरी वापर आणि लघुपटाच्या निर्मितीमध्ये समन्वय यासाठी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुरवातीस मंत्री श्री काब्राल यांनी श्री संग्रामसिंह गायकवाड दिग्दर्शित आणि गोवा राज्य प्रदूषण मंडळ निर्मित लघुपटाचे प्रकाशन केले.

गोवा राज्य प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष श्री महेश पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
सहाय्यक अभियंता जीएसपीसीबी श्रीमती. इंदिरा राऊत यांनी सूत्रसंचालन केले.