- वेदांता लिमिटेड – मूल्यवर्धित व्यवसाय आमोणा नावेली तर्फे सरकारी माध्यमिक विद्यालय नावेली येथे संगणक प्रयोगशाळा तसेच अंगणवाडी केंद्राचे नूतनीकरण या सामाजीक उपक्रमांचे लोकार्पण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना उत्कर्ष शिष्यवृत्ती प्रदान.
चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार तीन उपक्रमांचा फायदा
गोवा खबर : वेदांता समूहाच्या मूल्यवर्धित व्यवसाय (व्हीएबी)च्या माध्यमातून आमोणा आणि नावेली या गावांमध्ये शिक्षणाच्या पायाभूत सुविधांच्या सीएसआर उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. सरकारी माध्यमिक विद्यालय , नावेली येथे सुसज्ज संगणक प्रयोगशाळा प्रदान करण्यात आली तसेच दुरिगवाडा नावेली येथील अंगणवाडी केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह वेदांता लिमिटेड लोह खनिज व्यवसायचे सीइओ सुजल शाह, वेदांता लिमिटेडच्या व्हीएबीचे सीईओ सप्तेश सरदेसाई , वेदांता लिमिटेडच्या सीएसआर प्रमुख लीना वेरेंकर तसेच आमोणा आणि नावेली पंचायतींचे नवनिर्वाचित पंचायत सदस्य, श्री लक्ष्मीनारायण देवस्थानचे पदाधिकारी आणि इतर जन प्रतिनीधी उपस्थित होते. वेदांताची उत्कर्ष विद्यार्थी शिष्यवृत्ती देऊन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी ६८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश जवळपासच्या परिसरातील इच्छुक तरुणांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे.
वेदांताचा सेसा गोवा लोहखनिज व्यवसाय अनिल अग्रवाल फाऊंडेशनच्या अंतर्गत विविध सुनियोजीत सीएसआर उपक्रमांद्वारे त्यांच्या उद्योगाच्या परिसरात असणाऱ्या जनतेच्या सर्वांगीण विकासात योगदान देत आहे. शिक्षण, बालकल्याण, आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी हे वेदांताच्या सीएसआर उपक्रमांचे प्रमुख विषय आहेत. वेदांताने स्थापन केलेली संगणक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना दर्जेदार संगणक प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी एक पुढचे पाऊल ठरेल आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देईल. शाळेच्या प्रशासकीय कामाची गरज म्हणून एक लॅपटॉपही प्रदान करण्यात आला. अंगणवाडी केंद्राच्या सुधारणा आणि नूतनीकरणाचा एक भाग म्हणून, वेदांताच्या व्हीएबीने शैक्षणिक साहित्य प्रदान केले आणि लहान वयातील मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या. भविष्यात सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या सहकार्याने मुलांचे पोषण आणि शैक्षणिक विकास आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हे वेदांताचे उद्दिष्ट आहे
समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासात वेदांताच्या योगदानाचे कौतुक करताना, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले, “वेदांता आपल्या विविध सीएसआर उपक्रमांद्वारे सामाजिक विकासात योगदान देत आहे. मी सर्वांना मानव संसाधनांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो ज्याचा आम्हाला दीर्घकाळ लाभ होईल”

वेदांता लिमिटेड लोह खनिज व्यवसायचे सीइओ सुजल शाह म्हणाले, “वेदांतामधील सुनियोजित सीएसआर कार्यक्रमांद्वारे आजूबाजूच्या समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदानाचा आमचा सतत प्रयत्न असतो. आमचा विश्वास आहे की शिक्षण हे समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे आणि आम्ही जवळपासच्या समुदायांमध्ये शिक्षण सुविधांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करत आहोत. मला खात्री आहे की हे उपक्रम अंगणवाडीच्या पायाभूत सुविधांद्वारे, मुलांमध्ये डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी दर्जेदार संगणक प्रशिक्षण देऊन सुरुवातीच्या टप्प्यात चांगल्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून शिक्षण आणि बालकल्याण सुविधा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील आणि प्रोत्साहन देतील. शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सरकार, पंचायत आणि शाळा प्रशासन यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”
मूल्यवर्धित व्यवसाय, वेदांत लिमिटेडचे सीईओ सप्तेश सरदेसाई म्हणाले, “वेदांताच्या मूल्यवर्धित व्यवसायात आम्ही जनतेच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीवर भर देतो, आमचे सामाजिक उपक्रम हे आमच्या व्यवसायाचे केंद्रबिंदू आहेत असं आम्ही मानतो, शिक्षण आणी बालविकास आमच्या सामाजीक उपक्रमांच्या केंद्रस्थानी आहेत.. या उपक्रमांतून मुलांच्या दीर्घकालीन हितासाठी, त्यांच्या कौशल्य विकासातुन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत
वेंदाता लिमिटेडच्या मूल्यवर्धित व्यवसायातर्फे सामाजिक विकासासाठी महत्वपूर्ण असे विविध प्रकल्प ज्यात ग्रामनिर्माण अंतर्गत शेती, मत्स्यपालन, पशुपालन वैद्यकीय सुविधा, पायभूत विकास इत्यादी उपक्रम राबवले जातात ,