Connect with us

गोवा खबर

केंद्रीय संचार ब्युरो, गोवा कार्यालयाकडून पणजी बस स्थानकावर मल्टीमिडीया प्रदर्शनाचे 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो, गोवा कार्यालय आणि कदंब परिवहन महामंडळ यांनी संयुक्तरित्या मल्टीमिडीया प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पणजी बस स्थानकावर 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान आयोजित प्रदर्शनाचे शनिवारी सकाळी 11 वाजता केटीसीएल अध्यक्ष आमदार उल्हास तुयेंकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. परिवहन सचिव, एम आर एम राव यांची याप्रसंगी उपस्थिती असणार आहे.  

भारतीय स्वातंत्र्यलढा आणि फाळणीशी संबंधित 50 छायाचित्र आणि स्वातंत्र्यानंतर देशाचा प्रवास यावरील 40 छायाचित्र असे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्यलढ्यावर माहिती देणारी चित्रफीतही प्रदर्शनादरम्यान लावली जाणार आहे. नागरिकांसाठी बुधवार, 17 ऑगस्टपर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्युरोने केले आहे.