Connect with us

गोवा खबर

राष्ट्रपती करणार नवीन राजभवनची पायाभरणी 

Published

on

Spread the love
 गोवा खबर: राष्ट्रपती  राम नाथ कोविंद १४ जून आणि १५ जून २०२२ रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असतील. ते १४ जून २०२२ रोजी गोव्यात पोहचणार आहेत.
राष्ट्रपती कोविंद आपल्या गोवा दौऱ्यात १५ जून २०२२ रोजी नवीन राजभवन संकुलाची पायाभरणी करतील. गोव्याचे राज्यपाल, श्री.  पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत आणि विविध खात्यांचे मंत्री यावेळी उपस्थित असणार आहेत.
राष्ट्रपती १५ जून २०२२ रोजी गोव्यातून परतणार आहेत.

Continue Reading