Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हिस्टिऑन टेक सेंटर गोवाचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयटी मंत्री श्री. रोहन खवंटे यांच्या उपस्थितीत आज शहरातील व्हिस्टिऑन टेक सेंटर गोवाचे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आमच्या सरकारने गोव्यातील आयटी क्षेत्राला बळकट करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी विविध धोरणे आखली आहेत असे सांगितले . गोव्यातील विस्टिऑन टेक सेंटरच्या उद्घाटनामुळे आमचे सरकार गोव्यातील विविध आयटी उद्योगांचे स्वागत करीत असल्याचा योग्य संदेश संपूर्ण देशात आणि आयटी क्षेत्रामध्ये जाईल असे ते म्हणाले.

डॉ. सावंत यांनी राज्याला आयटी आणि तंत्रज्ञान हब बनविण्यासाठी आम्ही खाजगी उद्योगांना तसेच तंत्रज्ञान कर्मचार्‍यांना आकर्षित करीत आहोत असे सांगून गोव्याला नॉलेज पार्टनर बनविण्यासाठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी गोव्याला नॉलेज हब बनविण्याचा विचार करीत आहे असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी आम्ही पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमानंतर स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाद्वारे गोवा सर्व क्षेत्रात स्वावलंबी बनविण्याची योजना सुरू केली आहे असे सांगितले. आयटी क्षेत्रासाठी आमची दृष्टी गोव्याला आयटी हब बनविणे असा आहे. गोव्यात त्यांचे केंद्र स्थापन केल्याबद्दल व्हिस्टिऑनचे अभिनंदन करून त्यांनी  व्हिस्टिऑनसारखे भागीदार आयटी क्षेत्रात गोवा स्वयंपूर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील असे ते म्हणाले.

उपस्थितांसमोर बोलताना माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री रोहन खवंटे यांनी राज्यातील आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी सरकारच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला.

यावेळी उपस्थित होते व्हिस्टिऑन टेक सेंटर गोवाचे अध्यक्ष आणि सीईओ श्री. सचिन लवंदे, श्री रॉबर्ट व्हॅलेन्स व इतर मान्यवर उपस्थित होते.