Connect with us

गोवा खबर

राजभवन आणि राज्यपालांच्या सचिवालयाची सध्याची इमारत अबाधित राहील

Published

on

Spread the love

नवीन राजभवनाबाबत राज्यपाल कार्यालयाचे स्पष्टीकरण

गोवा खबर: राज्यपाल कार्यालयाने नवीन राजभवनाच्या बांधकामावर कांही घटकांतील लोकांनी घेतलेल्या आक्षेपावर स्पष्टीकरण दिले आहे की सध्याची राजभवन पॅलेसची रचना ४०० वर्षांहून अधिक जुनी आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.    

पुढे असेही स्पष्टीकरण दिले आहे की गेल्या काही वर्षांमध्ये राजभवनाच्या गरजा आणि आवश्यकतामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून आधुनिक सुविधा आणि इतर सुविधांसह अधिक जागा आवश्यक आहे. त्यामुळे कॅम्पसमध्ये उपलब्ध असलेल्या जागेवर राजभवन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. राजभवन आणि राज्यपालांच्या सचिवालयाची सध्याची इमारत अबाधित राहील आणि त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा बदल केला जाणार नाही अशी माहितीही देण्यात आली आहे.