गोवा खबर: पणजी येथील सांतिनेज जवळील नॅशनल कॅफे समोर आंब्याचे झाड चालत्या दुचाकीवर पडले.दुचाकीवरील दोघे जण सुखरूप बचावले.राजधानी पणजी मधील धोकादायक झाडे वेळीच कापली नाही तर जीवावर बेतू शकेल अशी भीती पणजीवासीयांनी बोलून दाखवली.
हेल्मेट घातल्याने आपण बचावलो, लोकांनी मला बाहेर काढले असे दुचाकी चालकाने सांगितले.
झाड पडल्याने दोन दुचाकी आणि एका विंगर ट्रव्हलरचे मोठे नुकसान झाले.झाड पडल्याने 2 गंजलेले वीजेचे खांब देखील कोसळून पडल्याने परिसरा मधील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन झाड कापून रस्ता मोकळा केला. झाड पडल्याने 2 दुचाक्या आणि विंगर ट्रव्हलरचे मोठे नुकसान झाले आहे.दोन गंजलेले वीजेचे खांब देखील कोसळून पडल्याने त्यावरील वीज पुरवठा खंडित झाला होता.