Connect with us

गोवा खबर

पर्यटन खात्याचे व्यवहार पुढील आठवड्या पासून ऑनलाइन:पर्यटन मंत्री

Published

on

Spread the love
गोवा खबर:राज्यातील पर्यटन वाढीसाठी आणि पर्यटन उद्योगातील व्यावसायिकांसाठी येत्या आठवड्याभरात सर्व नोंदणीकरण प्रक्रिया ऑनलाईन केल्या जातील, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी दिली.
ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाच्या 34 व्या शपथविधी सोहळ्यात ते बोलत होते. दोनापावल येथे आयोजित सोहळ्यास पर्यटन खात्याचे सचिव रवी धवन, टॅगचे नवनिर्वाचित अध्यक्ष नीलेश शाह, माजी अध्यक्ष सविओ मेसायस आणि कार्यकारी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री खवंटे म्हणाले, राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी सरकार अधिक प्रयत्न करत आहे. या उद्योगातील व्यावसायिकांना यापूर्वी अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. विविध प्रकारचे परवाने आणि ना – हरकत दाखले घ्यावे लागत होते. हे सर्व प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन करावे लागत होते. यात त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात होता.
टॅग ही संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मी स्वतः पर्यटन उद्योगात होतो. यामुळे मला या व्यवसायातील अडचणी आणि समस्या माहीत आहेत. टॅगच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलेल्या सर्व समस्या सोडवल्या जातील. तसेच राज्यातील पर्यटन वाढीसाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सरकार त्यांच्यासोबत असेल, अशी ग्वाही मंत्री खवंटे यांनी यावेळी दिली.

Continue Reading