Connect with us

गोवा खबर

‘द मेल्टडाउन’ या चित्रपटातील अभिनयासाठी माया ओ’रुर्क यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘सिल्वर पिकाॅक’ पुरस्कार

Published

on

Spread the love


सिनेमातील गूढतेचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत प्रेक्षकांनाही खेचून आणणाऱ्या ओ’रुर्क यांच्या अभिनयाची परीक्षक मंडळाने घेतली गौरवपूर्ण दखल

माया ओ’रुर्क यांचा अभिनय आणि दिग्दर्शिका मॅन्युएला मार्टेली यांच्या दृष्टिकोनातील अपवासात्मक सुसंगतेचे प्रशंसापत्रातून कौतुक

गोवा खबर:57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीत मॅन्युएला मार्टेली दिग्दर्शित ‘द मेल्टडाउन’ या चित्रपटातील अभिनयासाठी माया ओ’रुर्क यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘सिल्वर पिकाॅक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.

सखोल बारकावे टिपणारा अभिनय आणि कलात्मक प्रभावाची दीर्घकाळ टिकणारी छाप सोडणाऱ्या माया ओ’रुर्क यांच्या अभिनयाची गौरवपूर्ण दखल या पुरस्कारातून घेतली गेली. माया ओ’रुर्क यांनी आपल्या पडद्यावरील अस्तित्वाने मोहून टाकणारे वातावरण निर्माण केल्याबद्दल परीक्षक मंडळाने त्यांची प्रशंसाही केली.

हा पुरस्कार देतानाच्या प्रशंसापत्रात माया ओ’रुर्क यांच्या अभिनयाचे परिक्षक मंडळाने केलेले वर्णन असे आहे –

कुतूहल जागृत करणाऱ्या आणि सिनेमातील गूढतेचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत प्रेक्षकांनाही खेचून आणणाऱ्या मोहक अभिनयनासाठी. अभिनेत्री आणि दिग्दर्शकामधील अपवादात्मक दृष्टिकोनातील अद्भुत सुसंगतेने या अभिनयाला आणखी उंचीवर नेले आहे.

या सन्मानामुळे माया ओ’रुर्क या ज्यांच्या कलेमुळे यंदाची स्पर्धा अद्वितीय सिनेमॅटिक प्रतिभेचा उत्सव ठरली अशा कलाकारांच्या यादीत सामील झाल्या आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ‘सिल्वर पिकाॅक’ पुरस्काराअंतर्गत ‘पिकाॅक’ मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे.

‘द मेल्टडाउन’ चित्रपटाचा सारांश

1992 मधील चिली येथील दुर्गम अँडियन स्की रिसॉर्टच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा घडते. या चित्रपटातून नऊ वर्षांच्या इनेस हिची गोष्ट मांडली आहे. ती तिच्या आजी-आजोबांच्या हॉटेलमध्ये राहत असते. तिची हॅना या 15 वर्षांच्या जर्मन स्कीअरशी मैत्री होते. जेव्हा हॅना अचानक गायब होते, तेव्हा तिचा शोध घेताना अनेक गुपिते आणि दडलेली सत्ये समोर येतात.

https://platform.twitter.com/embed/Tweet.html?dnt=false&embedId=twitter-widget-0&features=eyJ0ZndfdGltZWxpbmVfbGlzdCI6eyJidWNrZXQiOltdLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X2ZvbGxvd2VyX2NvdW50X3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9iYWNrZW5kIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19yZWZzcmNfc2Vzc2lvbiI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZm9zbnJfc29mdF9pbnRlcnZlbnRpb25zX2VuYWJsZWQiOnsiYnVja2V0Ijoib24iLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X21peGVkX21lZGlhXzE1ODk3Ijp7ImJ1Y2tldCI6InRyZWF0bWVudCIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZXhwZXJpbWVudHNfY29va2llX2V4cGlyYXRpb24iOnsiYnVja2V0IjoxMjA5NjAwLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X3Nob3dfYmlyZHdhdGNoX3Bpdm90c19lbmFibGVkIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19kdXBsaWNhdGVfc2NyaWJlc190b19zZXR0aW5ncyI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdXNlX3Byb2ZpbGVfaW1hZ2Vfc2hhcGVfZW5hYmxlZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdmlkZW9faGxzX2R5bmFtaWNfbWFuaWZlc3RzXzE1MDgyIjp7ImJ1Y2tldCI6InRydWVfYml0cmF0ZSIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfbGVnYWN5X3RpbWVsaW5lX3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9mcm9udGVuZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9fQ%3D%3D&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=2126679408895254976&lang=mr&origin=https%3A%2F%2Fwww.pib.gov.in%2FPressReleasePage.aspx%3FPRID%3D2343274%26reg%3D1%26lang%3D9&sessionId=534eb0bdee96ddc31ef77bc3f32732f4da2d5047&theme=light&widgetsVersion=6a3ad42b224df%3A1778106238597&width=550px

Continue Reading