Connect with us

गोवा खबर

एसआयआर अंतर्गत तयार केलेली मतदार यादी रद्द करा; काँग्रेसची मागणी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा

Published

on

Spread the love


गोवा खबर : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतून तयार करण्यात आलेली मतदार यादी रद्द करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केली आहे. या प्रक्रियेत विविध कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, एसआयआर प्रक्रियेतून तयार करण्यात आलेल्या मतदार यादीविरोधात काँग्रेसने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे (CEO) आक्षेप नोंदवला आहे. ही मतदार यादी रद्द करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना कारवाईसाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत योग्य कारवाई न झाल्यास एसआयआर प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असा इशारा गिरीश चोडणकर यांनी दिला आहे