Connect with us

गोवा खबर

महिला आयोगाकडून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:डिजिटल आणि फिजीकल स्टॉल्कींगबद्दलच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय महिला आयोगाने गोवा राज्य महिला आयोगाच्या सहकार्याने शिवोली येथील सेंट फ्रान्सिस झेवियर शाळेत संबंधित विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिवोलीच्या आमदार श्रीमती. दिलायला लोबो यांनी गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रंजिता पै, सदस्य सचिवा श्रीमती. उपासना माजगावकर, आयोगाच्या सदस्या श्रीमती. ज्योती सावंत, उपसमितीचे सदस्य ॲड. विदाता देसाई, ॲड. दिपाली कारे यांच्या उपस्थितीत केले.

आमदार, श्रीमती दिलायला लोबो यांनी विद्यार्थी समुदायाला फिजीकल, डिजिटल स्टॉल्कींग आणि इतर सायबर गुन्ह्यांबरोबर विविध प्रकारांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांनी लोकांनी आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी, स्मार्टफोनचा जबाबदारीने वापर करावा आणि स्टॉल्किंगच्या कोणत्याही घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी असे सांगितले. त्यांनी लोकांना सायबर स्टॉकिंगबाबत मदत मिळविण्यासाठी १९३० या हेल्पलाइनचा वापर करण्याचे आवाहनही केले.

याप्रसंगी बोलताना ॲड. रंजिता पै यांनी प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. महिलांसाठी सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक संबंधित घटकाने योगदान दिले पाहिजे असे सांगितले.

पोलीस निरीक्षक श्री. विद्यानंद पवार यांनी ‘स्टॉकिंग आणि सायबर स्टॉकिंग समजून घेणे, डिजिटल सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय’ या विषयावर व्याख्यान दिले. ॲड. पूनम आजगावकर यांनी ‘कायदेशीर हक्क आणि तक्रार निवारण यंत्रणा’ या विषयावर आपले विचार मांडले. क्रिस्टॅबल डायस यांनी ‘स्टॉकिंगचे मानसिक परिणाम आणि आधार प्रणाली’ या विषयावर व्याख्यान दिले.

हा उपक्रम विद्यार्थी, नोकरदार महिला, उद्योजक आणि बचत गटांसाठी आयोजित करण्यात आला होता.