Connect with us

गोवा खबर

राज्यपाल राजेंद्र आर्लेकार यांच्याहस्ते श्याम गांवकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

Published

on

Spread the love

गोवा खबर: युवावस्थेकडे झेपावणाऱ्या किशोरवयीनांना आणि नवयुवकांना सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या नवविचारांवर आधारित श्याम अनंत गांवकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘मनवेध’ आणि ‘अविरत’ या दोन नवीन लेखसंग्रहांचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मिनी हॉल, मिनेझिस ब्रागांझा सभागृह, पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे.

केरळ आणि तामिळनाडूचे राज्यपाल मा. श्री. राजेंद्र आर्लेकर यांच्या शुभहस्ते या दोन्ही पुस्तकांचे लोकार्पण होणार आहे.

कार्यक्रमाला माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री. अभिर हेदे, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे चेअरमन श्री. दशरथ परब तसेच पत्रकार श्री. संगम भौसुले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. श्री. संगम गोविंद भौसुले हे दोन्ही पुस्तकांवर आपले विचार मांडणार आहेत.

‘मनवेध’ आणि ‘अविरत’ या लेखसंग्रहांमध्ये किशोरवयीन आणि नवयुवकांच्या मनाला सकारात्मक दिशा देणारे, जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देणारे तसेच विचारांना चालना देणारे विविध विषय मांडण्यात आले आहेत. समाजातील विविध घटनांचे निरीक्षण, अनुभव आणि चिंतन यांमधून आकाराला आलेले हे लेखन वाचकांना वैचारिक उभारी देणारे ठरेल, अशी अपेक्षा आहे. अविरत या पुस्तकासाठी गोवा मराठी अकादमीतर्फे प्रकाशनपूर्व अनुदान प्राप्त झालेले आहे.

लेखक श्याम अनंत गांवकर हे पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव आणि सामाजिक जीवनातील विविध घटनांच्या अभ्यासाच्या आधारे लेखन करीत असून, त्यांच्या लेखणीतून सामाजिक जाणीव, सकारात्मक विचार आणि जीवनमूल्ये यांचा संगम साधला आहे. त्यांची दोन कोंकणी नाटके आणि शिवकालीन जलनीती हे अनुवादीत पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे.

या आनंदाच्या आणि लेखकासाठी अत्यंत महत्त्वाच्या क्षणी वाचक, साहित्यप्रेमी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.