Connect with us

गोवा खबर

गोवा विधानसभेत 13 विधेयके मांडणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Published

on

Spread the love

गोवा खबर : आगामी गोवा विधानसभा अधिवेशनात पुरवणी विनियोग विधेयकांसह सुमारे 13 विधेयके सभागृहात मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

अधिवेशनादरम्यान सरकारकडून विविध विधेयके विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये पुरवणी विनियोग विधेयकांचाही समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अधिवेशनातील नियमित प्रश्न, चर्चा आणि इतर कामकाज हे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानुसार घेतले जाईल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

त्यामुळे आगामी अधिवेशनात विधायी कामकाजाला महत्त्व राहणार असून, सरकारकडून जवळपास 13 विधेयके सभागृहासमोर आणली जाणार आहेत.