Connect with us

गोवा खबर

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला ५० वर्षे पूर्ण होत असून उध्या २२ ऑगस्ट रोजी मंडळाचा सुवर्ण महोत्सव वर्ष कार्यक्रम कुजिरा, बांबोळी येथील मुष्टीफंड हायस्कूलच्या इंदिशिला सभागृहात सकाळी ९.३० वाजता साजरा केला जाईल.

कला आणि संस्कृती संचालक, श्री विवेक नाईक हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, तर मुष्टीफंड संस्थानचे व्यवस्थापक, श्री दिलीप धारवाडकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

वर्षभर चालणाऱ्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून, मंडळ गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला प्रकार आणि लोक परंपरा दर्शवणारा “लोक कला दर्शन” हा लोकनृत्य कार्यक्रम आयोजित करणार आहे. गोव्याच्या विविध भागांतील १२ शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा इयत्ता दहावीच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकातील संकल्पनेवर आधारित सादरीकरण करतील.

या कार्यक्रमात विद्यार्थी आणि कलाकार एकत्र येऊन पारंपरिक नृत्य, संगीत आणि वेशभूषेच्या माध्यमातून गोव्याची रंगीबेरंगी आणि वैविध्यपूर्ण लोकसंस्कृती सादर करतील.

सुवर्ण महोत्सवी वर्ष हा मंडळाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या पाच दशकांमध्ये, मंडळाने सार्वजनिक परीक्षा आयोजित करण्यात आणि राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली आहे.

‘लोक कला दर्शन’ या लोकनृत्य सादरीकरणाचा उद्देश केवळ हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करणे हाच नाही, तर विद्यार्थ्यांना गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.