Connect with us

गोवा खबर

नौदलासाठी अत्याधुनिक विमाने भाडेतत्वावर घेण्‍यासंबंधी संरक्षण मंत्रालयाचा करार

Published

on

Spread the love

गोवा खबर:संरक्षण मंत्रालयाने जनरल ऍटॉमिक्स एरोनॉटीकल सिस्टीम्स आयएनसी (जीए-एएसआय) या कंपनीसोबत दोन एमक्यू – 9बी विमाने भारतीय नौदलाला 30 महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर देण्याबाबत करार केला आहे. ही विमाने समुद्र रक्षक, सर्वोच्च उंचीवर दीर्घकाळ टिकणारी, (एचएएलइ) दूरस्थ पद्धतीने नियंत्रित करता येणारी (आरपीएएस) आहेत. हा करार सुमारे 1,943 कोटी रुपयांचा आहे. संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि महासंचालक (अधिग्रहण) ए. अनबरासु यांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीत कर्तव्य भवन 2 इथे या करारावर स्वाक्षरी केली.

एमक्यू -9बी समुद्र रक्षक एचएएलइ आरपीएएस विमानांमध्ये आधुनिक यंत्रणा असून त्यामध्ये अत्याधुनिक सेन्सर्स आणि आधुनिक पेलोडस् आहेत. या विमानांमुळे भारतीय नौदलाची समुद्री भागातील सतर्कता लक्षणीयरित्या वाढेल. ही यंत्रणा सातत्याने माहिती पुरवेल, टेहळणी करेल आणि समुद्राच्या बऱ्याच मोठ्या भागात या टेहळणीची व्याप्ती असेल. यामुळे भारताचे हिंद महासागर भागातील घडामोडींवर देखरेख ठेवण्याचे व त्यांना प्रतिक्रिया देण्याचे सामर्थ्य मजबूत होईल.