Connect with us

गोवा खबर

ज्येष्ठ संगीतकार रेमो फर्नांडिस यांचा भावूक निरोप; लंडनमध्ये पार पडला शेवटचा कॉन्सर्ट

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोव्याचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक रेमो फर्नांडिस यांनी लंडनमध्ये आयोजित ‘गोवा डे’ कार्यक्रमात आपल्या संगीत कारकिर्दीतील शेवटचा कॉन्सर्ट सादर केला.

कार्यक्रमादरम्यान त्यांनी वाढते वय आणि प्रकृतीच्या समस्यांमुळे बसूनच गाणी सादर केली. कोरोनानंतर झालेला सौम्य स्ट्रोक, वर्टिगो आणि नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेमुळे गिटार आणि बासरी वाजवणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

८ मे १९५३ रोजी गोव्यात जन्मलेल्या रेमो फर्नांडिस यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीत क्षेत्रात प्रवास सुरू केला. मुंबईत आर्किटेक्चरचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी युरोप आणि आफ्रिकेत फिरून संगीताचा अभ्यास केला.

१९८७ मध्ये ‘जलवा’ चित्रपटातील शीर्षक गीतामुळे त्यांना देशभर लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘हम्मा हम्मा’, ‘प्यार तो होना ही था’ आणि ‘खामोशी’ यांसारख्या गाण्यांमुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली.

संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या ते पोर्तुगालमध्ये राहत असले तरी वर्षातील काही महिने गोव्यात घालवतात. शारीरिक अडचणी असूनही त्यांच्या आवाजाची जादू आणि चाहत्यांशी असलेले नाते आजही कायम असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.

Continue Reading