Connect with us

गोवा खबर

‘फ्री उमर खालिद’ फलकाचा अभाविपकडून निषेध; विद्यार्थी आंदोलन भरकटवू नये, अशी भूमिका

Published

on

Spread the love

गोवा खबर : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून ‘फ्री उमर खालिद’ आणि ‘फ्री शर्जील’ असे फलक झळकवण्यात आल्याच्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) तीव्र निषेध केला आहे.

या पार्श्वभूमीवर रविवारी पणजीतील आझाद मैदानावर अभाविपने निषेध सभा आयोजित केली. या सभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कन्या पार्थवी सावंत यांच्यासह विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अभाविपचे म्हणणे आहे की, नीट परीक्षा पेपरफुटीविरोधातील आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुरतेच मर्यादित राहावे. त्याचा वापर देशविरोधी किंवा इतर राजकीय अजेंड्यासाठी होऊ नये. संबंधित फलकांमुळे आंदोलनाचा मूळ मुद्दा भरकटत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

पार्थवी सावंत यांनी विद्यार्थी आणि तरुणांचा वापर कोणत्याही देशविरोधी विचारसरणीला पाठिंबा देण्यासाठी होऊ नये, असे सांगत अशा प्रकारच्या घोषणांचा निषेध केला.

दरम्यान, आंदोलनाशी संबंधित करीना शिरोडकर यांनी, “देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी. मला अटक झाली तरी त्याची पर्वा नाही,” अशी भूमिका मांडली.

या प्रकरणात देशविरोधी घोषणांना किंवा फलकांना पाठिंबा देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही अभाविपने केली आहे.