Connect with us

गोवा खबर

ज्येष्ठ पत्रकार व बांदोड्याचे माजी सरपंच गोकुळदास मुळवी यांचे निधन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक, शिक्षक आणि बांदोडा पंचायतीचे माजी सरपंच गोकुळदास मुळवी यांचे सोमवारी रात्री वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने गोवा पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

जवळपास पाच दशके (५० वर्षे) त्यांनी गोव्यातील माध्यम क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. फोंडा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला.

अंत्यसंस्कार आज

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १२:३० वाजता वर्कखंडे-फोंडा येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.