Connect with us

Uncategorized

दिलेला शब्द पाळला! संकेत आर्सेकर यांच्याकडून काले सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या स्कूल बसची सोय

Published

on

Spread the love

गोवा खबर : भाजप नेते संकेत आर्सेकर यांनी काले सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करत त्यांच्या शाळेच्या प्रवासासाठी स्वतःची स्कूल बस उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, वेळेवर आणि कोणत्याही अडचणीशिवाय शाळेत पोहोचता यावे, या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला.

सरकारकडून शाळेसाठी कायमस्वरूपी स्वतंत्र स्कूल बसची व्यवस्था होईपर्यंत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आर्सेकर यांनी स्वतःची बस तात्पुरत्या स्वरूपात सेवेत रुजू केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न तात्पुरता का होईना, पण मोठ्या प्रमाणात सुटला असून पालकांनाही दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना वाहतुकीच्या विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन संकेत आर्सेकर यांनी विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. आता ते आश्वासन प्रत्यक्षात उतरवत त्यांनी स्वतःची स्कूल बस विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित वाहतूक सुविधा मिळणार असून, सरकारकडून कायमस्वरूपी बस उपलब्ध होईपर्यंत ही व्यवस्था सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक नागरिक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाने या निर्णयाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे.

Continue Reading