Connect with us

गोवा खबर

दिव्यांग व्यक्तींना देशभक्तिपर कराओके गायन स्पर्धा : २०२६ मध्ये आपल्या प्रतिभेचे सादरीकरण करण्याचे आवाहन

Published

on

Spread the love
  • दोन वयोगट श्रेणींमध्ये व्हिडिओ क्लिपसह नोंदणी करता येणार; अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ जुलै
  • गोवा खबर : गोवा शासनाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने, डिसॅबिलिटी अलायन्स फॉर इन्क्लुझिव्ह गोवा (DAIG) या संस्थेच्या सहकार्याने, गोव्यातील दिव्यांग व्यक्तींना देशभक्तिपर कराओके गायन स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
  • या स्पर्धेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गायनकौशल्याचे सादरीकरण करण्यासाठी सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच देशभक्तीची भावना जागृत करत आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि समाजातील सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे.
  • राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी पात्र इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करत म्हटले की, “देशभक्तिपर कराओके गायन स्पर्धा ही प्रतिभा, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रीय अभिमानाचा उत्सव आहे. संगीतामध्ये प्रेरणा देण्याची, लोकांना एकत्र आणण्याची आणि सक्षम बनविण्याची विलक्षण ताकद आहे. हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वासाने स्वतःची अभिव्यक्ती सादर करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतांचे प्रभावी सादरीकरण करण्यासाठी एक अर्थपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देतो. गोव्यातील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हावे आणि आपल्या सुरेल आवाजातून देशाला प्रेरणा देत सर्वसमावेशक व सुलभ समाजाचा संदेश अधिक दृढ करावा.”
  • ही स्पर्धा केवळ गोव्यात वास्तव्यास असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी असून ती पुढील दोन गटांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे:
  • गट १: वय १८ वर्षांपर्यंत
  • गट २: वय १८ वर्षे पूर्ण व त्यावरील स्पर्धकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा कोंकणी भाषेतून कोणतेही एक देशभक्तिपर कराओके गीत गातानाचा स्वतःचा व्हिडिओ सादर करायचा आहे. सादरीकरणाचा कालावधी पाच मिनिटांपेक्षा अधिक नसावा. गायनासाठी केवळ कराओके किंवा पार्श्वसंगीताचा वापर करता येईल. प्रत्येक स्पर्धकाला फक्त एकच प्रवेशिका सादर करता येईल.
  • स्पर्धकांनी आपला व्हिडिओ २६ जुलै २०२६ पर्यंत खालील अधिकृत गुगल फॉर्मच्या माध्यमातून अपलोड करावयाचा आहे: https://forms.gle/EGXFdmqoB64SR4iKA
  • प्राप्त प्रवेशिकांमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. निवड झालेल्या स्पर्धकांना ई-मेलद्वारे माहिती देण्यात येईल.
  • शैक्षणिक संस्था, विशेष शाळा, स्वयंसेवी संस्था, पुनर्वसन केंद्रे, पालक संघटना तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत सर्व संस्थांनी या स्पर्धेची माहिती व्यापक स्तरावर पोहोचवून पात्र स्पर्धकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
  • दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आणि राज्य दिव्यांग आयुक्त कार्यालय गोवाभरातील दिव्यांग व्यक्तींच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा व्यक्त करत असून, संगीताच्या माध्यमातून प्रतिभा, देशभक्ती आणि सर्वसमावेशकतेचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.