गोवा खबर : गोवा प्रदेश काँग्रेसने राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यात वाढत्या खून, बलात्कार, अपहरण आणि अंमली पदार्थांच्या तस्करीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच, विरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप एका राजकीय पक्षाला आर्थिक मदत करत असल्याचा गंभीर आरोपही गिरीश चोडणकर यांनी केला.