गोवा खबर : गोव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून अमित पाटकरांना हटवल्यानंतर पक्षात नाराजी पसरली आहे. नाराज झालेला एक गट काँग्रेसपासून वेगळा होऊन नवीन ‘गोवा काँग्रेस’ नावाचा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
या नव्या पक्षाच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करण्यात आल्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेऊन काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल तातडीने गोव्यात दाखल झाले आहेत. गिरीश चोडणकर यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवल्यापासून ही नाराजी उफाळून आली आहे, ज्यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेल्याचे चित्र आहे.