Connect with us

गोवा खबर

कुंकळ्ळी मतदारसंघातून एल्विस गोम्स संभाव्य उमेदवार; विद्यमान आमदारांविरोधात स्वाभिमानी कुंकळीकरांची घोषणा

Published

on

Spread the love

गोवा खबर: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कुंकळ्ळीकर यांनी कुंकळ्ळी मतदारसंघातून एल्विस गोम्स यांना संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

संघटनेने ही घोषणा विद्यमान आमदारांविरोधात निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने केली असून, आगामी निवडणुकीत कुंकळ्ळी मतदारसंघात सक्षम पर्याय उभा करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला आहे.

एल्विस गोम्स यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर कुंकळ्ळीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे.