Connect with us

गोवा खबर

७.५ लाख वीजबिलांतील चुका दुरुस्त; जादा आकारलेले शुल्क पुढील बिलात समायोजित होणार : सुदिन ढवळीकर

Published

on

Spread the love

गोवा खबर: राज्यातील वीजबिलांमधील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ७.५ लाख वीजबिले दुरुस्त करण्यात आली आहेत, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

ढवळीकर म्हणाले की, चुकीची सर्व वीजबिले पुढील एका वर्षाच्या आत दुरुस्त करण्याचे उद्दिष्ट वीज खात्याने ठेवले आहे. ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आलेले अतिरिक्त वीजभार (Excess Load Charges) आणि दंड (Penalties) यांची रक्कम संबंधित ग्राहकांच्या पुढील वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वीजबिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी वीज खाते सातत्याने काम करत असून, सर्व ग्राहकांना योग्य आणि अचूक बिले मिळावीत यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.