Connect with us

गोवा खबर

पॉश कायद्यांतर्गत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

Published

on

Spread the love

गोवा खबर:दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत मुख्य अधिकारी आणि मामलेदारांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

केपे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना केपे नगरपालिकेच्या हद्दीत नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काकोडा-कुडचडे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना काकोडा-कुडचडे नगरपालिकेच्या हद्दीत नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केपे तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत केपेच्या मामलेदारांना, सांगे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना सांगे नगरपालिकेच्या हद्दीत, सांगे तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत सांगेच्या मामलेदारांना, काणकोण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना काणकोण नगरपालिकेच्या हद्दीत, काणकोण तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत काणकोणाच्या मामलेदारांना, धारबांदोडा तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत धारबांदोडाच्या मामलतदारांना, मडगाव नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची मडगाव नगर परिषदेच्या हद्दीत, कुंकळी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची कुंकळी नगरपालिकेच्या हद्दीत नोडल, सासस्टी तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत सासस्टीच्या मामलेदारांची, म्हापसा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची म्हापसा नगरपालिकेच्या हद्दीत, म्हापसा तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत म्हापसा येथील मामलेदारांची, फोंडा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची फोंडा नगरपालिकेच्या आणि फोंडा तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत फोंडा येथील मामलेदारांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नोडल अधिकारी आपापल्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी स्वीकारतील आणि त्या तक्रारी दक्षिण गोवा जिल्हा व कुशावती जिल्हा गोवा येथील स्थानिक तक्रार समितीकडे पाठवतील. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायद्याखाली तक्रारी स्वीकारण्यास नोडल अधिकाऱ्यांची योग्य व्यवस्था केली पाहिजे आणि तक्रारीची गुप्तता पाळली पाहिजे. तसेच लोकांना स्थानिक तक्रारीची माहिती दिली पाहिजे.