Connect with us

गोवा खबर

गरजूंसाठी घरपोच आरोग्यसेवा संपूर्ण गोवाभर विस्तारणार : आरोग्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील गरजू रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेली घरपोच आरोग्यसेवा (Home Care Facility) आता संपूर्ण गोव्यात विस्तारण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली आहे.

राणे यांनी सांगितले की, सध्या या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ८०० रुग्णांना मिळत असून या सेवेत परिचारिका (नर्सेस), फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आणि अन्य आरोग्य कर्मचारी सहभागी आहेत. घरच्या घरी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही सेवा अधिक व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. विशेषतः कर्करोग, पक्षाघात (स्ट्रोक) आणि अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना त्यांच्या घरापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

या योजनेसाठी कार्यरत असलेले विशेष पथक पुढील तीन महिन्यांत आणखी विस्तारले जाणार असून राज्यातील अधिकाधिक गरजू नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.