Connect with us

गोवा खबर

नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या अध्यक्षांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर”नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष राबी लामिछाने यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने, या बैठकीबद्दल नमूद केले की,”सामायिक आणि समृद्ध भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या लामिछाने यांच्या मनीषेचे पंतप्रधान स्वागत करत आहेत असून भारत त्यात पूर्णपणे सहभागी आहे” तसेच या भेटीने पंतप्रधानांना संतोष झाला असल्याचे ही त्यांनी पुढे म्हटले आहे.

‘शेजारी प्रथम’ या धोरणाप्रमाणे नेपाळ हा भारताचा एक प्रमुख सहकारी आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. उभय देशांमधील विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी नव्या सरकारसोबत सहकार्य करण्यास भारत उत्सुक असल्याचेही  पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष राबी लामिछाने यांना भेटून मला आनंद झाला आहे. मी त्यांचे स्वागत करतो आणि सामायिक आणि समृद्ध भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या त्यांच्या मनिषेला दुजोरा देतो.

आमच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार नेपाळ हा आमचा एक प्रमुख भागीदार आहे आणि उभय देशांमधील विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी नवीन सरकारसोबत सहकार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”