Connect with us

गोवा खबर

2027 निवडणुकांपूर्वी विधानसभा ST आरक्षणाची अंमलबजावणी करा; भाजपची मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा भाजपने 2027 विधानसभा निवडणुकांपूर्वी अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

या निवेदनाद्वारे भारतीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गोव्यातील आदिवासी समाजाला विधानसभा स्तरावर योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असे भाजपने म्हटले आहे.

गोव्यातील अनुसूचित जमाती समाजाच्या राजकीय सहभागाला बळकटी देण्यासाठी आणि त्यांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे पक्षाने निवेदनात नमूद केले आहे.