Connect with us

गोवा खबर

प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल

Published

on

Spread the love

गोवा खबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस हायमांडने गोवा प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाचे अनुभवी नेते गिरीश चोडणकर यांच्याकडे पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली असून, दत्ता डी. नायक यांची नवीन खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यासोबतच एम. के. शेख, आमदार एलटन डिकॉस्टा आणि कार्लुस फेरेरा यांची कार्याध्यक्ष म्हणून तर अलेमांव यांची प्रचार समिती अध्यक्षपदी आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची जाहीरनामा समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस्को सार्दिन आणि सुनील कवठणकर यांच्याकडे समन्वय समितीची जबाबदारी देण्यात आली आहे.